सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:35 IST)

पुणे हादरले

पुणे येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या भोसरी परिसरात राहत असलेल्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नी व चार वर्षाच्या मुलासोबत आपलं आयुष्य संपवल आहे. हा खळबळजनक प्रकार आज उघड झाला आहे. पोलिसांच्या नुसार आयटी इंजिनिअरनं पत्नी, मुलाची हत्या केली मग त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणात आय टी इंजिनिअर जयेश कुमार पटेल (वय 34), भूमिका पटेल (वय 30 ) व अक्षय पटेल (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. उच्च दर्जाच्या वसंत विहार सोसायटीमधील ही घटना समोर आली आहे. तीन जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते तर त्यांना दीड लाख रुपये महिना पगार होता. पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरी करत. त्यांची पत्नी गृहिणी होती. मात्र दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद ठेवले होते. संशय आल्यानं शेजार्‍यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास याची माहिती दिली. यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी धाव घेतली. दुसऱ्या इमारतीच्या बालकनीतून पोलीस पटेल यांच्या घराजवळ पोहोचले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळल आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पटेल त्यांचा मुलगा रोगाने ग्रस्त होता त्यातून सुटका व्हावी म्हणून असे पाऊल त्यांनी उचलले असावे असा कयास आहे. अक्षयचा मृतदेह तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत होता तर जयेश व भूमिका दोघांच्याही गळ्याभोवती दोरीचे व्रण पोलिसांना प्राथमिक तपासातून आढळून आले. त्यातून पोलिसांनी मुलाचा व पत्नीचा खून करून जयेशने आत्महत्या केली असावी, किंवा दोघांनीही एक सोबत आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.