रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग़्टन (अमेरिका) , गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:40 IST)

पॅलेस्टाईनची 6.5 कोटी डॉलर्सची मदत ट्रम्प यांनी रोखली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाईनला दिली जाणारी 6.5 कोटी डॉलर्सची मदत रोखली आहे. जर पॅलेस्टाईनने इस्रायलबरोबरच्या शांती समझोता करण्यात सहकार्य केले नाही, तर अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात येईल अशी ट्विटद्वारे धमकी दिली होते. ती धमकी त्यांनी मंगळवारी पुरी करून दाखवली आहे.
 
अमेरिकेकडून पॅलेस्टाईनला यूएनरिलीफ अँड वर्क एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सुमारे 12.5 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या मदतीपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 6.5 कोटी डॉलर्सची मदत रोखल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची मदत मिळणारा पाकिस्तान हा एकमेव देश नाही. असे अनेक देश आहेत. पॅलेस्टाईनलाही आम्ही दरवर्षी काही शे अब्ज डॉलर्सची मदत देतो, मात्र त्याच्या बदल्यात आम्हाला काही प्रशंसा वा सन्मान मिळत नाही. इस्रायलबरोबर दीर्घकाळापअसून चालू असलेल्या शांतिवार्तेत काही प्रगती होण्यासाठी पॅलेस्टाईन काहीच करत नाही.
 
अमेरिकेने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे अमेरिकेकडून येणारा कोणताही शांती प्रस्ताव पॅलेस्टाईन स्वीकारणार नाही असे पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी रविवारी जाहीर केले होते.