बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

टॉयलेट केले घाण म्हणून एमरजन्सी लँडींग

शिकागो- विमानांचे एमरजन्सी लँडींग ही आता नवी गोष्ट राहिली नाही पण असे असले तरी, नुकतेच झालेले विमानाचे एमरजन्सी लँडींग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लँडींगचे कारण ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही घटना युनायटेड एअरलाईन्सच्या एका विमानात घडला. हे विमान गत गुरुवारी शिकागोवरुन हाँगकाँगला निघाले होते. मात्र प्रवासदरम्यान हे विमान आलस्का येथे अचानक उतरवावे लागले. विमानाचे एमरजन्सी लँडींग करावले लागले कारण एका प्रवाशाचे पोट अचानक बिघडले. त्याने विमानाच्या टॉयलेटमध्ये इतकी घाण केली की विमानाचे एमरजन्सी लँडींग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
 
टेड स्टीबेंन्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्‍यानेही प्रसारमाध्यमांना माहिती देताना या वृत्ताची पुष्टी केली. अधिकार्‍याने सांगितले की एका प्रवाशाने पोटातील बिघाडामुळे विमानातील शौचालयात इतकी घाण केली की इतर प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. इतकेच नव्हे तर या प्रवाशाने आपला शर्टही टॉयलेटमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला.