हाँगकाँगने काढली भारतीयांची व्हिसा सवलत
बीजिंग- भारतीयांना हाँगकाँग तिथे पोहचल्यावर दिल्या जाणार्या व्हिसाची सवलत आता काढून घेण्यात आली आहे. यापुढे भारतात हाँगकाँगचा आधी व्हिसा मिळवावा लागेल आणि तो मिळाल्यानंतरच तिथे जाता येईल.
दरवर्षी भारतातून लाखो लोक हाँगकाँगला पर्यटनासाठी जातात. त्यांना विमानतळावर पोहोचल्यावर व्हिसा दिला जातो. तो आता दिला जाणार नाही. त्यामुळे आधीच व्हिसा काढून ठेवावा लागेल. हाँगकाँगचा ऑनलाइन व्हिसा भारतात सोमवार 23 जानेवारीपासूनच दिला जाणार आहे. ज्या भारतीयांना हाँगकाँगमध्ये राहायचे आहे वा त्यांना अन्य ठिकाणच्या प्रवासात हाँगकाँगमध्ये थांबावे लागणार आहे, त्यांच्याकडे आधीच व्हिसा तयार असणे गरजेचे आहे.