शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

एच-1 बी व्हिसा नियमांमध्ये कोणताही बदल नाही

अमेरिकेत राहणार्‍या भारतीय नागरिकांना ट्रम्प सरकारने दिलासा दिला आहे. एच-1 बी व्हिसाधारकांवर ट्रम्प सरकारने अेनक निर्बंध लादले होते. त्यामुळे अनेक व्हिसाधारकांना अमेरिकेतून पुन्हा भारतात परतावे लागणार होते. परंतू अमेरिकेने भारतीय व्हिसाधारकांवर कडक निर्बंध लादण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एच-1 बी व्हिसाधारकांना अमेरिकेत सहा वर्षांहून अधिक काळ राहता येणार आहे.
 
तसेच ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणार्‍यांना अमेरिका सोडावी लागणार नाही. अमेरिकेने एच-1 बी व्हिसामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याने भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांना याचा फायदा पोहोचणार आहे.
 
अमेरिका काँग्रेस सभागृहाच्या एका उच्चाधिकार समितीने एच-1 बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात 30 हजार डॉलरची वाढ केली आहे.