1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. World most expensive vodka bottle stolen from Copenhagen bar

जगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला

व्होडकाची जगातली सर्वात महागडी बाटली चोरीला गेली आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमध्ये हा प्रकार घडला आहे. सोने-चांदीने मढवलेल्या व्होडकाच्या बाटलीची किंमत 1.1 मिलियन युरो म्हणजे तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.
 
तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करुन ही वैशिष्ट्यपूर्ण बाटली तयार करण्यात आली होती. 1912 च्या ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. 
 
जगभरात गाजलेल्या 'हाऊस ऑफ कार्ड्स' या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती.
 
कोपनहेगनमध्ये व्हेस्तेरब्रो हा अत्यंत गजबजलेला रोड आहे. या रस्त्यावर असलेल्या 'कॅफे 33' या बारमध्ये ही बाटली ठेवण्यात आली होती. तिथून चोरट्याने ही बाटली लंपास केली. 
पुढील लेख
गोवा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध