शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2017 (11:16 IST)

एका स्ट्रॉबेरीची किंमत फक्त दीड हजार रूपये

सध्या सुपरमार्केटचे युग अवरतले आहे. या मार्केटची दुनिया गर्भश्रीमंतांबरोबरच सामान्य आणि गरीब लोकांनाही आकर्षित करून घेत आहे. मात्र, हाँगकाँगमध्ये असे एक सुपरमार्केट आहे की तेथष एका स्ट्रॉबेरी दीड हजार रूपयांपर्यंत विकली जात आहे.
 
स्टॉबेरी म्हटले की लालभडक गोड रसाळ फळ डोळ्यासमोर येते. हे एक असे फळ आहे की त्याला पाहताच खाण्याची अतिव इच्छा होते. मात्र हे फळ हाँगकाँगमधील या सुपरमार्केटमधून विकत घेऊन तुम्ही खाणार नाही, असेच वाटते. कारण तेथील एका स्टॉबेरीची किंमत 17.50 पौंड अर्थात 1460.57 रूपये इतकी आहे. सिटी सुपरम मार्केटमधील हे महागडे फळ पिंक कलरच्या रबर रिंगमध्ये अत्यंत आकर्षकपणे सजवून ठेवण्यात आले आहे. याच्या सभोवताली डेकोरेटिव्ह स्ट्रॉसुद्धा रचण्यात आल्या आहेत.
 
अत्यंत आकर्षक दिसत असलेल्या या डिझायनर फ्रूटमध्ये एक स्टिकरही लावण्यात आले आहे. यावर लिहिण्यात आले आहे की हे फळ चक्क जपानमधून विमानाने मागवण्यात आले आहे. म्हणूनच यातील एका स्ट्रॉबेरीला सुमारे दीड हजार रूपये आकारण्यात येत आहेत.