सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:15 IST)

सोनई हत्याकांड करवणारया राक्षसाना फाशी द्या - उज्ज्वल निकम

पूर्ण राज्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला हलवणारया अश्या  सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय आता 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. नाशिक जिल्हा विशेष न्यायालयात या केसचा  आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की त्याला दुर्मिळ असा समजून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली आहे.
 
नगर येथे 1 जानेवारी 2013 रोजी  सोनई या गावात  उच्च जातीच्या मुली सोबत प्रेमप्रकरणातून 3 जणांची निघृत  हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला. या सर्वांनी मिळून दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.
 
सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात की, आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे अत्यंत क्रूर असून त्यांनी हे सर्व फार  थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत.  हे सर्व प्रकरण इतके भयानक आहे की आरोपींनी नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड केले आहे. त्यांनी  प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून केला आहे.  हे सर्व पाहून तर  रामायणतील राक्षसांची आठवण व्हावी. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं आहे.पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे. तर त्या मुलीचा बाप ६० वर्षाचा होता तर त्याला हे कृत्य केल्यावर परिणाम काय होईल याची जाणीव होती त्याने हे सर्व घडवून आणले आहे. त्यामुळे या सर्वाना फाशीच झाली पाहिजे.