बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (12:22 IST)

आता व्हॉटस्‌अ‍ॅपद्वारेही पाठवता येणार पैसे

व्हॉटस्‌अ‍ॅपही डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यास सज्ज झाले असून पुढील महिन्यापर्यंत नवे पेमेंट फिचर सुरू करणार आहे. त्यामुळे जवळच्या व्यक्तींना पैसे पाठवणे आणखी सोपे होणार आहे.
 
मेसेजिंग अ‍ॅप म्हणून देशात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे व्हॉटस्‌अ‍ॅप युनिफाइड पेमेंट इंटरफेस 'यूपीआय'वर आधारित आपली पेमेंट सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या बँकांच्या सहकार्याने सुरू करणार आहे.