नेतेमंडळी गाडीने जाताना काचही खाली करत नाहीत. सामान्य माणूस जिथे वावरतो अशा ठिकाणी कार्यक्रमाव्यतिरीक्त शक्यतो जात नाहीत, असा गैरसमज लोकांना असतो. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , आ. विक्रम काळे,यांनी हा समज मोडीत काढत टपरीवर लोकांमध्ये बसून लोकांशी मनमोकळा संवाद साधला. कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधला. टपरीवरील स्पेशल भज्यांचाही त्यांनी आस्वाद घेतला.