रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: खेड , शनिवार, 12 जानेवारी 2019 (15:10 IST)

प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला? : अजित पवार

निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला? आता शिवसेना राम मंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. हनुमानाची आज 'जात' काढली जात आहे, पण देवांच्या जाती कशाला काढता, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा खेड येथे पार पडली. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. आज गोत्र विचारले जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्यो सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.
 
निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शूटिंग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही, असेही त्यांनी सांगितले.