शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (12:51 IST)

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार म्हणाले-

ajit pawar
अजित पवार हे सत्तेत सहभागी होण्यापूर्वी दिल्ल्लीत वेश बदलून जायचे या वर सुप्रिया सुळे यांनी संसदेत यावर चौकशी करण्याची मागणी केली. या वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे. या वर अजित पवारांनी विरोधकांना आणि सुप्रिया सुळे यांना सडेतोड उत्तर देत म्हटले की माझ्यावर आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, मात्र आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यावे. 
 
सत्तेत जाण्याच्या निर्णय मी मधल्या काळात घेतला त्यावेळी मी वेश बदलून दिल्लीला जाण्याचा चर्चा रंगल्या. माझ्यावर असे खोटे आरोप करण्यात आले . सध्या माझी बदनामी करून गैर समज करण्याचं काम सुरु आहे. 
एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा गुन्हा असून आता ठीक ठिकाणी सीसीटीव्ही केमेरे लावलेले आहे. विरोधक काहीही बोलतात.कुणी बहुरूपी तर कुणी काहीही म्हणतं आहे. माझ्यावर खोटे आरोप  करताना यांना लाज वाटायला पाहिजे. यांच्या केलेल्या आरोपाचे काहीच तथ्य नाही. 
 
संजय राऊत यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, त्याच्या बोलण्यात काहीच दम नाही. त्यांना पुरावा मिळाला का? कोणी म्हणतं मी मिश्या लावल्या होत्या, मास्क घातला होता, टोपी घातली होती. हे साफ खोटं आणि चुकीचं आहे. माझ्यावर केलेले हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. नाही झालं तर त्यांनी संन्यास घ्यावा. 
माझं संसदेला आव्हान आहे.हे प्रकरण तपासून पाहावे. आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून स्वतः बाजूला होईन. नसेल तर आरोप कारण्यारांनी राजकारणातून निवृत्त व्हायचे. असे खडेबोल त्यांनी सुप्रिया सुळेंना सुनावले आहे. 
Edited By- Priya Dixit