शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (17:27 IST)

13 कोटींची संपत्ती जप्त

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh),अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik)यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED)फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या 90 एकर जमिनीवर ईडीने टाच आणली आहे. 
 
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. कारण हा कारखाना खरेदी करण्यासाठी याच बँकेने त्यांना कर्ज दिलं होतं. या कारखान्याचा लिलाव 2012 मध्ये करण्यात आला होता. कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रूपये होती. मात्र हा कारखाना प्राजक्त तनपुरेंनी लिलावात 13 कोटी 41 लाखांना विकत घेतला. या सर्व व्यवहारांवर ईडीला संशय आहे. त्यामुळेच ईडीने चौकशी केली होती. आता त्यापाठोपाठ ईडीने आज मेसर्स तक्षशिला सिक्युरिटीज प्रा. लि. च्या नावावर असलेल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याच्या 90 एकर जमिनीसर त्यांच्या मालकीची आणि कारखान्याशी संलग्न असणारी 4.6 एकरची जमीनही जप्त केली आहे.