शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (21:32 IST)

T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

Two arrested for betting on T-20 World Cup final; 4.65 lakh confiscated
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी येथील कोंढवा रोडवरील  विष्णु विहार अपार्टमेंटमध्ये छापा (raid) टाकून T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटिंग (Betting) घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात काल सुरु असलेल्या मॅचवर बेटींग सुरु असताना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून येथून दोन जणांना अटक केली आहे. तर 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
ओंकार राजु समुद्रे (वय-25 रा. हुडको कॉलनी, ता. शिरुर सध्या रा. विष्णु विहार अपार्टमेंट, बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे)व निकित अजित बोथरा (वय-26 रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, सध्या रा. भिमाली कॉम्पलेक्स जवळ सॅलिसबरी पार्क, मार्केटयार्ड)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.आरोपींविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील कोंढवा रोडवरील विष्णु विहार अपार्टमेंटमध्ये न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग सुरु असल्याची माहिती पोलिसांना  मिळाली . त्यानंतर पोलिसांनी विष्णु विहार अपार्टमेंटमधील ए 5, फ्लॅट नं. 4 येथे छापा मारला.त्यावेळी ओंकार आणि निकेत हे दोघे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल व लॅपटॉवर सट्टा घेताना मिळून आले.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात (Pune Crime) घेतले. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप असा एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
 
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, महिला पोलीस अंमलादार शिंदे, पुकाळे, माने, मोहिते, कांबळे, चव्हाण कोळगे यांच्या पथकाने केली.