शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (14:35 IST)

Money laundering Case: गृह मंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी

मनी लाँड्रिंग(Money Laundering)  प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh)  यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
यापूर्वी पीएमएलए कोर्टाने ईडीच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली होती. 
देशमुख यांना कोठडीत ठेवून सचिन वाझे चा सामना करण्यासाठी ईडी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. 
अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) विशेष अधिवक्ता श्रीराम सिरसाट यांनी शुक्रवारी पीएमएलए न्यायालयात सांगितले की, मुंबई पोलिसांचे बडतर्फ केलेले एपीआय सचिन वाझे 100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.
 ईडीने त्याच्या कोठडीसाठी अर्ज केला आहे. ईडीला वाजे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर चौकशी करायची आहे. वास्तविक देशमुख अनेक प्रश्नांची बनावटी उत्तरे देत आहेत.