रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (10:35 IST)

राज्याची भरभराट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला साकडे घातले

कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सौ, सुनेत्रा यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अजित पवार यांनी श्री विठ्ठल -रुक्मिणीला राज्यावर आपली कृपादृष्टी कायम ठेवून राज्यात सुख शांती समृद्धी नांदो, कोरोनाचे संकट दूर होवो, राज्याचा भरभराट होवो. राज्यात सुख शांती नांदू दे. असे साकडे घातले. या महापूजेचा मान वारकरी म्हणून श्री कोंडीबा आणि सौ.प्रयागबाई टोणगे यांना देण्यात आला. टोणगे दाम्पत्याचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला गेला. त्यांना पवार यांच्या कडून राज्यपरिवहन महामंडळाचा प्रवास सवलत पास देखील देण्यात आला. या प्रसंगी कोरोनाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, अद्याप कोरोनाचे संकट टळले  नसून आपल्याला बेसावध होऊन चालणार नाही कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन सर्वानीच केले पाहिजे मास्कचा वापर आवर्जून केला पाहिजे . तरच आपण कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून रोखू  शकतो. एसटी संपा बद्दल बोलताना ते म्हणाले, की लवकरच राज्य सरकार कडून यावर तोडगा काढला जाणार.