बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:31 IST)

महावितरण कार्यालय जाळून टाकू; स्वाभिमानी शेतकरी संघटना

वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याची भरपाई रब्बी हंगामात भरून निघेल, अशी आशा बाळगून शेतकरी झाले गेले विसरून नव्या दमाने तयारीला लागले आहेत. मात्र पेरणीपूर्वीच विजेचे भारनियमन सुरू झाले असून, महावितरणच्या अवकृपेने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
 
अगोदरच शेतकरी हा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रासलेला आहे. आता मात्र शेतकऱ्यांनी रबीपीकातिल गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. त्यात महावितरण ने भारनियमन चालू करून शेतकऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. जर यानंतर शेतकऱ्यांना त्रास द्यालतर महावितरण कार्यालय जाळून टाकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी दिला आहे.