मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (16:55 IST)

Road Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेले

Road Accident: The truck came down and killed two close friends on the road Road Accident : ट्रक खाली येऊन दोन जिवलग मित्रांचे प्राण रस्त्यावरच गेले Maharashtra News Regional Marathi News  In Webdunia Marathi
कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात भीषण अपघातात दोन जिवलग तरुण मित्रांचा ट्रक खाली चिरडून दुर्देवी अंत झाला. हा अपघात चंदगड गडहिंग्लज मार्गावर झाला. जय ज्योतिबा मासरणकर(19) आणि अजित आप्पाजी पाटील (18) असे या मयत तरुणाची नावे आहे. हे दोघे कॉलेज मधील जिवलग मित्र असून चंदगड तालुक्यातील सातवणे येथील रहीवासी होते. हे दोघे शनिवारी सायंकाळी आपल्या दुचाकी वरून अडकूर येथून इलेक्ट्रिकचे साहित्य घेऊन घरी सातवणे ला जात असताना मंदगतीने चालणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून खाली पडले आणि वाचले पण काळाने झडप घातली आणि ते दोघे समोरून येणाऱ्या ट्रक खाली चिरडले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे दोन जिवलग मित्रांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी या दोघांची अपघाती मृत्यू ची नोंद केली असून तपास करत आहे.