शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)

अमरावती हिंसाचार प्रकरणी 50 आरोपींना अटक; पोलीस आयुक्त आरती सिंग

त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचारा नंतर अमरावतीत आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे अमरावतीत घडलेल्या घटनेबद्दल आतापर्यंत 15 गुन्हे दाखल करण्यात आले.
 
हिंसाचारा नंतर आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही आरोपींना अटक करण्याची मोहीम सुरू आहे. तसेच काही लाठ्या जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली, अमरावती शहरात झालेल्या घटनेनंतर प्रथमच पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी प्रतिक्रिया दिली, अमरावतीत सध्या शांतता असून त्यांनी शांततेच देखील आवाहन केले आहे.