रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (12:19 IST)

जादूटोणा झाल्याचं सांगत भोंदूबाबाकडून विवाहितेवर बलात्कार

एका भोंदूबाबाने आपल्या जाळ्यात अडकवून एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड येथे घडली आहे. तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे. या जादूमुळेच तुमचं सासरच्यांसोबत पटत नाही असे सांगून विवाहितेवर अत्याचार केला. 
 
आरोपीनं पीडित महिलेला आपल्या घरी बोलावाले नंतर तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला. 
 
मुख्य आरोपीच्या मित्राने देखील पीडितेकडे लैंगिक सुखाची मागणी केली असून याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
शेख याहिया असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर मुख्य आरोपी अजीज बाबा फरार आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय पीडितेचं आपल्या सासरी पटत नव्हतं. तिचं सासरच्या लोकांसोबत वाद सुरू होता. आरोपीनं पीडितेच्या कौटुंबीक वादाचा फायदा घेत तिच्यावर जादूटोणा झाल्याचं सांगितलं. जादूटोणा दूर करून संसार सुरळीत केल्याचं सांगत अजीज बाबाने पीडितेला आपल्या घरी बोलावलं. तिला पाण्यातून गुंगीचं औषध पाजून आरोपीनं पीडितेला विवस्त्र करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज शूट केले. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बाबाने तिच्यावर अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर मुख्य आरोपी अजीजचा मित्र शेख याहिया यानेही पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी केली.