ganesh chaturthi
✕

अटक वॉरंट तामिल करायला गेलेल्या पोलिसांवर जीवे हल्ला ; एक जागीच ठार तर दोन जखमी

Updated: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (16:18 IST)
 
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके वय ५२, हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे वय ४८, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे वय ३१, पो.चालक राहुल बोन्डे वय ३२, पोलीस नाईक निलेश वाढई वय ३५ सर्व पोलीस वाहन क्रमांक एम.एच. ३७ ए ४२४६ ने अजामीनपात्र वारंट घेऊन आरोपी अनिल लेतू मेश्राम वय ३५ याला ताब्यात घेण्याकरीता आरोपीच्या घरी आज सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास गेले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलीस असल्याचे सांगितले. तुझ्यावर अटक वारंट आहे. म्हणून पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. तेंव्हा मी येत नाही. तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून दाखवा असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला होता. अचानक झालेल्या हल्याने पोलीस घाबरून गेले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलीसांनी स्वरक्षणासाठी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी मोठ- मोठ्याने आवाज देत गावातील लोकांना मदतीला बोलविले. मात्र आरोपी अंधारात पळून गेला.यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेन्द्र कुळमेथे यांना घेऊन पोलीस माघारी मारेगावला आले. राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.मारेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत अनिल मेश्राम याच्यावर भा द वी 324 ; 452 गुन्हा दाखल होता. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आरोपी न्यायालयात कधीही हजर झाला नव्हता. न्यायालयाने आरोपीवर अटक वॉरंट बजावला होता . तो तामिल करण्यासाठी हे सर्व पोलिस गेले होते. आरोपी हा विकृत असल्याचे समजते. यापूर्वीही त्याने पोलिसांवर हल्ला केल्याचे समजते. या घटने नंतर पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments