रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (22:15 IST)

शिंदे साहेब मंत्रिपद देण्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला

bachhu kadu
राज्यात गेल्या काही महिन्यात मोठ्या घडामोडी झाल्या आहे. माविआ सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार बनली. दोन महिन्यापूर्वी या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार झाला. त्यात शिंदे आणि फडणवीस गटाच्या 8-8 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या मंत्रिमंडळात एकही अपक्ष आमदार नव्हता. या मंत्रिमंडळात आपल्याला जागा न मिळाल्यामुळे काही आमदार नाराज झाल्याचे वृत्त आले. त्यात बच्चू कडू देखील नाराज असल्याची चर्चा रंगली. या वर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.आज ते अमरावतीत माध्यमांसमोर संवाद साधतांना म्हणाले की, आमच्यासाठी मंत्रिपद मिळवणे फार मोठा विषय नाही, आमच्या कामातच मंत्रिपदाची ताकद असून आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार असून मुख्यमंत्री शिंदे साहेब हे आम्हाला मंत्रिपद देतील अशा आमचा विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गोष्ट नाही. हे मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही.