सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:11 IST)

मोदींवर पूर्ण विश्वास, पुढील 6 महिन्यांत राज्यात उद्योग येतील - अब्दुल सत्तार

abdul sattar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून पुढील 6 महिन्यात राज्यात नवे उद्योग येतील, याची मला खात्री आहे, असं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं आहे.
 
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावर सत्तार बोलत होते.
 
"हे दोन महिन्यांचं किंवा दीड महिन्यांचं सरकार नाही. मागच्या सरकारने अडीच वर्षांत सरकारने काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कशामुळे प्रकल्प तिकडे गेला, हे दोन्ही सरकारचं काम पाहिल्यावर कळेल," असं सत्तार यावेळी म्हणाले.