Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhandara :अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला

Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (22:34 IST)

भंडारा जिल्ह्यातील हरदोली  गावातील मारोती कबल गायधणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असता गावातील नागरिक आणि नातेवाईक जमले होते. त्यावेळी सरणातून निघणाऱ्या धुरे मुळे स्मशानभूमीत चिंचेचे झाडावर मधमाशांचे पोळे होते. सरणाचे धूर लागल्याने मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. 

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांनी हल्ल्यापासून वाचण्यासाठी सैरावैरा पळायला सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. 
 
 दोन दिवसांपूर्वी पुण्यातील राजगड किल्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. आता भंडाऱ्यात स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार सुरु असताना. जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. मृतदेहाला अग्नी देताना निघालेला धूर झाडावरील असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापर्यंत पोहोचला आणि मधमाशांनी हल्ला केला. या मुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली. 
 

Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ दिली

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांसाठी मुदतवाढ दिली

UPI MDR Charges: २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यावसायिक व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते, विधेयक संसदेत सादर

पुण्यात महिलेचे नवजात बाळाच्या तोंडात प्राणघातक फेव्हिक्विक घालून अमानुष कृत्य

महाराष्ट्रातील रेजिडेंट डॉक्टर ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर; सरकारी रुग्णालयांमधील OPD बंद राहणार

पुढील लेख
Show comments