1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र उत्सव
Written By
Last Updated : मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (20:45 IST)

नवरात्रोत्सवामुळे सप्तशृंगगड रस्त्यावर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंदी

Saptashrungi
सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेला नांदुरीपासून गडापर्यंतचा रस्ता डोंगराळ भागातून जात असून, अनेक धोकादायक वळणे आहेत. रस्ताही अरुंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्त्यावर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
 
अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 15 च्या सकाळी 6 वाजेपासून ते दि. 24 च्या मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही वाहनाला नांदुरीतून सप्तशृंगगडावर जाता येणार नाही. भाविकांची सोय म्हणून फक्त एस. टी. बसेस प्रवाशांची वाहतूक करतील. त्यानंतर एक दिवस वगळता दि. 26 च्या सकाळी 6 वाजेपासून ते दि. 29 रोजी मध्यरात्रीपर्यंत कोजागिरी पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी वाढते. त्यामुळे पुन्हा एकदा नांदुरी ते सप्तशृंगगड वाहतूक बंद राहील.
 
नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा यात्रा या निमित्ताने दि. 15 च्या सकाळपासून ते दि. 29 च्या मध्यरात्रीपर्यंत येणाऱ्या भाविकांनी एस. टी. महामंडळाच्या बसेसचा प्रवासासाठी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रवाशांना केले आहे.
 






Edited By - Ratnadeep Ranshoor