Daily Horoscope
✕

बर्ड फ्लू’! साडेआठ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश

Updated: शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:15 IST)
 
गेल्या काही दिवसांत रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले. चार मार्चला आलेल्या अहवालात या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंझाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
 
प्रशासनाने नियमानुसार संबंधित कुक्कुटपालन केंद्राचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया केली गेली. सोबतच केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले.
 
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुंडलिक म्हणाल्या, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये संक्रमण आढळल्यावर नियमानुसार कोंबड्या आणि अंडी नष्ट केली. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही कुक्कुटपालन केंद्रावर सध्या संक्रमण झाल्याची माहिती समोर आली नाही.

Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

फ्लायदुबईमध्ये कॅप्टन स्मिथ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाची ओळख उघड झाली

भारतीय पुरुष हॉकी संघासमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान; मलेशियाशी सामना होणार

अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या स्फोटक खेळींमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध २११ धावांपर्यंत पोहोचला

३६ वर्षीय महिलेने डेटिंग अॅप्स सोडून Google Form भरला, २४० हून अधिक पुरुषांनी अर्ज केला!

LIVE: हिंगोली जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंपांचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments