suvichar

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व

शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (07:40 IST)
धुळे  :  जिल्हा परिषदेच्या ३९ व्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या फागणे गटातून निवडून आलेल्या अश्विनी भटू पवार तर उपाध्यक्षपदी भाजपचे शिंगावे गटाचे देवेंद्र जयराम पाटील यांची ३८ विरूद्ध १६ मतांनी निवड झाली. दोन अपक्षांनी भाजपला साथ दिली. तर शिवसेनेच्या दोन सदस्या तटस्थ राहिल्या. निवडीनंतर भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
 
पीठासीन अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अध्यक्षपदासाठी  भाजपकडून अश्विनी भटू पवार, उपाध्यक्षपदासाठी देवेंद्र जयराम पाटील यांनी तर महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (उबाठा) धमाणे गटाच्या सुनीता शानाभाऊ सोनवणे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी कॅांग्रेसच्या बोरविहिर गटाच्या मोतनबाई रावण पाटील यांनी अर्ज दाखल केले.
 
हात उंचावून झालेल्या मतदानात अध्यक्ष,उपाध्यक्षांना प्रत्येकी ३८ तर महाविकास आघाडीच्या अध्यक्ष,उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते मिळाली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

मुंबईत सीजेपीच्या आंदोलनानंतर ९०० जणांविरोधात सात एफआयआर दाखल, मुंबई पोलिसांनी महानगरात दक्षता वाढवली

Top 10 Scooters: टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक आणि अथर रिझता यांच्या कमाईत वाढ, होंडा ॲक्टिव्हाचे वर्चस्व कायम

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

महागणेशोत्सव जागतिक स्तरावर पोहोचणार, जगभरातील गणेश मंडळांना भरघोस पारितोषिके मिळणार; महाराष्ट्र सरकारची घोषणा

पुढील लेख
Show comments