बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (13:30 IST)

Ekvira Aarti एकवीरा देवीची आरती

ekvira devi dhule
आरती एकवीरा | देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी|
देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.||
कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ ||
चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ ||
दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ ||
हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ ||
तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ||
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ ||
शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ||
 
************************ 
 
एकवीरा देवीची आरती
येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥