Marathi Biodata Maker
✕

बीड मशीद स्फोट प्रकरणाला भाजप नेता जबाबदार! वारिस पठाण यांचा आरोप

Updated: सोमवार, 31 मार्च 2025 (12:50 IST)
ALSO READ: पंतप्रधान मोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी आरएसएस कार्यालयात भेट देण्याचा संजय राऊतांचा दावा
या प्रकरणात, वारिस पठाण यांनी जलदगती न्यायालयात प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बीडमधील मशिदीतील स्फोटावर एआयएमएआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले, "त्यांना कोण प्रोत्साहन देते? भाजप नेत्यांकडून दररोज दिल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. सरकारने या प्रकरणातील आरोपींवर कठोर यूएपीए कायदा लागू करावा, त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि त्यांना कठोर शिक्षा मिळावी."
ALSO READ: बीड जिल्ह्यात मशिदीत मध्यरात्री रात्री मोठा स्फोट
ते म्हणाले, जे भाजपचे नेते बेकायदेशीर वक्तव्य देतात त्यांना देखील शिक्षा मिळावी. नेत्यांच्या द्वेषामुळे मशिदींवर हल्ले होत आहे. त्यावर रिल्स बनवल्या जात आहे. जेव्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नाही तेव्हाच लोकांचे धाडस वाढते. म्हणून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत आहे जेणे करून या मुळे भविष्यात होणाऱ्या घटनांना रोखू शकू. 

बीडच्या मशिदी हल्ल्यामागे भाजपचे नेते असल्याचे वारीस पठाण म्हणाले, कारण भाजप नेत्यांना हे माहित आहे की बीड हा एक संवेदनशील जिल्हा असून देखील ते धर्मविरोधी भाषण देतात आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम म्हणजे बीड मशिदीतील स्फोट आहे. आरोपींसह भाजपच्या नेत्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: कुणाल कामरा यांना सुरक्षा द्यावी,संजय राऊतांची केंद्र सरकार कडे मागणी
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments