1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 मार्च 2025 (13:36 IST)

बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या, सोशल मीडियावर मुलीची माफी मागितली

suicide
बीडमध्ये एका शिक्षकाने दबावामुळे आत्महत्या केली आणि सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या मुलीची माफी मागितली.धनंजय अभिमान नागरगोजे असे या मयत शिक्षकाचे नाव आहे. 
शनिवारी केज तालुक्यातील देवगाव रहिवासी धनंजय अभिमान नागरगोजे यांनी स्वराज्य नगर संकुलातील एका बँकेच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

धनंजय हे केळगाव येथे कायमस्वरूपी विनाअनुदानित आश्रम शाळेत शिक्षक होते. त्यांना 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित केले असून त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. 
त्यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये आपल्या मुलीची माफी मागाईतली असून त्यांनी लिहिले बाळा मला तुझी माफी मागायची आहे. पण माझी तशी लायकी नाही. मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पहिले पण ते पूर्ण झाले नाही.
मी कोणाची फसवणूक केलेली नाही. पण आज मी स्वतः अशा लोकांच्या तावडीत अडकलो आहो ज्यांनी माझे शोषण केले. आता त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. आता मी माझी सुटका त्यांच्या तावडीतून करत आहे. 
त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट मध्ये भावनिक होऊन म्हटले, 
मी 18 वर्षांपासून शाळेत काम करत आहे पण मला अजून माझा पगार मिळालेला नाही." मी माझा पगार मागितला तेव्हा मला खूप मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत मी काय करावे असे विचारले असता, शाळेशी संबंधित एकाने मला गळफास घेण्याचा सल्ला दिला. अशा परिस्थितीत माझ्याकडे गळफास घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. असे म्हणून गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
Edited By - Priya Dixit