रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (16:03 IST)

पार्थ पवार यांना खरच शरद पवार यांना निवडून आणायचे होते का ? - भाजपा नेते चंद्रकांत पाटील

जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवार यांना खरच निवडून आणायचे होते का ? तर मग त्यांनी पार्थला बारामतीतून का उभे केले नाही ? असा प्रश्न भाजप नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित केल आहे, यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवारांना त्यांच्या पक्षात घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना पुन्यांहा उमेदवारी दिली होती असे पाटील म्हणाले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या आहेत, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभवाला सामोरे जावे लागले आहे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
 
या लागलेल्या निकालावरून पाटील यांनी पवारांवरच निशाणा साधला आहे. पार्थ यांची ही पहिलीच निवडणूक होती, मात्र सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी निवडणुका लढल्या, शरद पवारांना जर पार्थ पवारला निवडून आणायचं होत, तर त्यांनी पवारांचा हुकमी असलेला बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. मात्र त्यांनी  केलं नाही. त्यांनी स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळेंना बारामतीतून तिकीट दिलं आणि पार्थ पवारांना मावळमधून लढण्यास सांगितलं” असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केल आहे. या टीकेमुळे आता पुन्हा नवीन वादाला सुरुवात होणार आहे.