मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 23 मे 2019 (08:33 IST)

महाराष्ट्रातील या तीन जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला

एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपला राज्यात 36 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व पणाला लागलंय. जर इथे पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा तो पराभव असेल. महाराष्ट्रातील तीन जागा हायप्रोफाईल लढती आहेतच, शिवाय राज्यातील पुढील राजकारणाची दिशाही ठरवणार आहेत. ह्या जागा आहे बारामती, मावळ आणि नांदेड.