राज ठाकरे यांची राजकीय ताकद वाढणार, विधानसभेत जिंकणार दोन आकडी जागा

raj thakare
Last Modified मंगळवार, 21 मे 2019 (09:24 IST)
राज ठाकरे यांचा पक्ष मनसे हा विधानसभेत यश मिळवणार असून, राज ठाकरे यांच्या करिष्म्याने दोन आकडी जागा मनसे जिंकणार आहेत, तर देशाच्या पंतप्रधान पदी मात्र पुन्हा नरेद्र मोदीच विराजमान होणार असे भाकीत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी केले आहे. नाशिकमध्ये आयोजित दोनदिवसीय राज्य ज्योतिष्य अधिवेशनाचा समारोप झाला. यावेळी आलेल्या ज्योतिष्यांनी देश व महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि उमेदवारांची कुंडली मांडत सत्तेची गणिते मांडली आहेत.
माटकरयांच्या भाकिता नुसार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होणार आहे. राज ठाकरे यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येतोय, त्यामुळे पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत दोन आकडी जागा जिंकता येतील असे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांनी कोणताही उमेदवार न देता मात्र जोरदार प्रचार केला आहे. त्यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला होता. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राभरात सभा घेतल्या, सभांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत नक्की होईल, त्यामुळे महाराष्ट्रात युतीला मोठा फटका बसून शिवसेनेच्या जागा हातातून जाणार आहेत, राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळावणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल. या निवडणुकीत मनसेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल आणि मनसेचे दोन अंकी आमदार निवडून येतील असे भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

अंधश्रद्धा चूक की बरोबर

अंधश्रद्धा चूक की बरोबर
आजचा काळ विज्ञानाच्या असून देखील बरेच लोक अंधश्रद्धे मध्ये विश्वास ठेवतात. अशे लोक भोंदू ...

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक ...

कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला दरम्यान, ...

मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अर्थात शनिवारी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार ...

राज्यात कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 5,229 नवीन रुग्ण वाढले असून 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू ...

वाचा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती अशोक चव्हाण यांनी ...

वाचा, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती अशोक चव्हाण यांनी काय दिली
येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच सदस्यीय ...