1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2019 (17:57 IST)

ही तर मौन की बात होती, राज ठाकरे यांचे ट्विट

loksabha elections 2019
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकांचे बोलणे ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही असाही आरोप राज ठाकरेंनी केला. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात याचं उत्तरही त्यांनी पत्रकारांना द्यावं अशीही मागणी राज ठाकरेंनी केली आहे. ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोललेच नाहीत त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतके दिवस दादागिरी केली, ती दादागिरीच त्यांना भोगावी लागणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायचेच नव्हते तर मग ते या पत्रकार परिषदेला का गेले होते असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. शनिवारी सकाळीही मोदींची पत्रकार परिषद म्हणजे मन की बात नाही तर मौन की बात होती असं ट्विटही राज ठाकरेंनी केलं होतं.