गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (16:59 IST)

मतदानाचा वेळ बदलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

voting
रमजानच्या महिन्यात मतदानाचा वेळ बदलता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मतदानाच्या वेळेबद्दल निर्णय घ्यायचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. याआधी लोकसभा निवडणुकीच्या काळात रमजान महिना सुरु असल्याने मतदानाचा वेळ बदलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयातदाखल करण्यात आली होती.
 
मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे उपवास असलेले व्यक्ती  घराबाहेरही जास्त पडत नाहीत. याचाच आधार घेत वकील निजामुद्दीन पाशा यांनी रमजान दरम्यान मतदान सकाळी सात ऐवजी पहाटे पाच वाजता सुरू करण्यात यावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.