शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (08:49 IST)

अहमदनगर शहराच्या वाहतुकीत महत्वाचे बदल, प्रवास करण्यापूर्वीच जाणून घ्या

अहमदनगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इंम्पेरिअल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
 
नागरिक व वाहनचालकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळेन वाहतुकीतील बदल कायम ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. १७ ते ३० जून २०२२ पर्यंत वाहतूक मार्गामध्‍ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
 
पुण्याकडून औरंगाबादकडे जाण्यासाठी : सक्कर चौक- टिळक रोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड- स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे.
 
कल्याण रोडने येणारी वाहने : नेप्ती नाका- टिळक रोडने आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर -राज पॅलेस रोड स्वस्तिक चौकमार्गे.
 
रेल्वे स्टेशनकडून येणारी वाहतूक :सक्कर चौक -टिळक रोड -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर- राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे.
 
औरंगाबाद कडून पुणेकडे : इंम्पेरिअल चौक – चाणक्य चौक – आनंदऋषीजी हॉस्पिटल रोड- सक्कर चौकमार्गे पुणे. तर एस.टी बस स्वास्त‍िक चौक-चाणक्य चौक- आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड- सक्कर चौक मार्गे पुण्याकडे जातील.
 
अवजड वाहतूक : सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन येथील मालधक्‍यावरील वाहने, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने व शासकीय अन्नधान्याची वाहतूक करणारे अवजड वाहनांना हा आदेश लागू नाही.