Daily Horoscope
✕

पुन्हा थंडी परतणार, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊन तापमानात घट होण्याची शक्यता

Updated: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:46 IST)
 
समुद्रात ‘गती’ आणि ‘निवार’ या चक्रीवादळांच्या निर्मितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे थंडी गायब झाली. त्यामुळे आता राज्यात निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तिसऱ्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. १ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. ३ डिसेंबरला ते तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. या प्रक्रियेमुळे तमिळनाडू, दक्षिण केरळ भागांत अतिवृष्टी होईल. महाराष्ट्रात मात्र त्याचा परिणाम होणार नाही. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाला चालना मिळून तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवडय़ात काही प्रमाणात थंडी अवतरणार आहे.
 
मध्य महाराष्ट्रात सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदवली जात आहे. सरासरीपेक्षा ३ ते ६ अंशांनी अधिक तापमान या भागांत आहे. मराठवाडय़ातही तापमानाची स्थिती तशीच आहे. कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अशांनी वाढ असून, विदर्भात गोंदिया आणि अमरावती वगळता सर्वत्र तापमानात वाढ आहे. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली

LIVE: भारतीय नौदलाने मुंबईत आयएनएस मंगरोलला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले

राहुल गांधी घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता नष्ट करण्याचा कट रचत आहे, मुख्यमंत्री फणवीसांनी तीव्र प्रतिक्रिया दिली

पुण्यात स्वारगेट बस डेपोमधून तब्बल २६,७४० रुपयांची तिकिटे चोरीला

सागरी सामर्थ्याला चालना मिळणार! भारतीय नौदलाने मुंबईत आपल्या ताफ्यात INS Mangrol चा समावेश केला

पुढील लेख
Show comments