Dharma Sangrah
✕

आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही : संजय राऊत

Updated: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:02 IST)
 
आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबरच आहे. शिवसेनेने याआधी 23 जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना लढणार आहेच, ही आमची भूमिका आहे. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, पण काँग्रेसकडे एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत”, अशा शब्दात सध्या काँग्रेसकडे एकही खासदार नसल्याबाबतचा टोला संजय राऊत यांनी लगावला.
 
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही 23 जागा लढणार आहोत, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगत आहोत. महाराष्ट्रातील काही नेते टिप्पणी करत असतील तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. शेवटी काँग्रेसचे दिल्लीतील नेते याबाबत निर्णय घेतील. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवार यांनी चर्चा केली, तशी उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली. शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीचा निर्णय आधीच झालेला आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी आणि इडिया आघाडीत असावे, अशी आमची भूमिका आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

तेल नाही, अर्थव्यवस्था नाही... काहीच उरले नाही, इराण उद्ध्वस्त झाला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

LIVE: महाराष्ट्रातील आश्रम शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी नऊ सदस्यीय समिती करणार

विवो V80 7200mAh बॅटरी आणि 50MP झाईस (ZEISS) कॅमेऱ्यासह लॉन्च झाला, किंमत जाणून घ्या

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिल्याबद्दल विराट कोहलीला ५ कोटी रुपये मिळाले का? मोठे सत्य समोर आले

अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीला भावपूर्ण निरोप दिला, त्याची 10 क्रमांकाची जर्सी हेलिकॉप्टरमधून फडकवण्यात आली

पुढील लेख
Show comments