suvichar

वर्गात मित्र सतत टपली मारतो, म्हणून चाकूने भोसून खून

बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (17:46 IST)
नाशिक शहरालगत असलेल्या ओझरमधील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी संजय राज जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती मिळाली आहे. यात सौरभ मनोजकुमार पाल (१४)  असे मृत विद्यार्थ्यांचे आहे.
 
सौरभ मला वर्गात सतत टपल्या मारत असे. याचा मला राग येत होता. त्यानंतर मंगळवारी पीटीचा तास चालू असताना सुद्धा त्याने मला टपली मारली. याचा मला खूप राग आला. त्यामुळे मी माझ्या दफ्तरातून आणलेल्या चाकूने त्याला भोसकले अशी धक्कादायक माहिती संजयने दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानावर ही घटना घडली. यावेळी जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यात आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीला चिथावणी देणे महागात पडले; सामनाधिकाऱ्याने दोन श्रीलंकन ​​खेळाडूंना शिक्षा आणि दंड ठोठावला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

Maharashtra Legislative Council Elections नाशिक-सोलापूरमध्ये ४ दिवसांचा 'ड्राय डे' जाहीर, दारू विक्रीवर संपूर्ण बंदी

पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांवर; उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

मुलीच्या जन्माचा आनंद शोकात बदलला; नाशिक अपघातात सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments