गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (14:54 IST)

३ मुलांची हत्या करून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर मध्ये एका पित्याने  ३ मुलांची हत्या करून  स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची घटना  धोतरावाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.  विष्णू इंगळे असे या वडिलांचे नाव असून मृतामध्ये अजय, मनोज आणि शिवानी या ३ मुलांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.
 

या घटनेत वडिलांनी आपल्या मुलांना आधी विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने २ मुलांना शॉक देऊन ठार केले. तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंट्याने घाव करून ठार केले. या हत्येनंतर त्या पित्याने स्वत: ला इजा करून गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.