गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:20 IST)

हल्लेखोर फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडले

फेरीवाला आंदोलन विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये या आंदोलनाचा राग मनात धरत  मनसेचे मालाडमधील विभाग प्रमुख सुशांत माळवदे यांना जबर  मारहाण झाली होती. या  प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. यात विशेष असे की  मारहाण करणाऱ्या दोघा पर प्रांतीयांना  मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
 
या दोन पर प्रांतीय संशयित आरोपींना  मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं आहे.तर या दोघांना  मालाड पोलिसांच्या ताब्यात घेतले  आहे. मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे  त्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेरीवाला विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. हा हल्ला झाला त्या नंतर सोशल मिडीयावर या विरोधात परप्रांतीय विरोधात मोठी टीकेची झोड उठली होती.