मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 3 जून 2020 (15:11 IST)

Cyclone Nisarga Live Updates 'निसर्ग' चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात धडकलं

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे. याचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे. 

अलिबागमध्ये वाऱ्याचा वेग ताशी १२०-१४० किलोमीटर
रायगडमध्ये झाडे उन्मळून पडली
दापोलीमध्ये इमारतींवरील पत्रे उडाली
अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित
चक्रीवादळानं आक्राळ विक्राळ रुप धारणं केलं
निसर्ग चक्रीवादळ नाशिकलाही धडकण्याची शक्यता
 
मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफची टीम तैनात
रायगड जिल्ह्यातील १३५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक १९१६, नंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागता येईल
मुंबईतील सहा चौपाट्यांवर रेस्क्यू बोट, जेट स्कीँ जीवरक्षक आदी सज्ज