Marathi Biodata Maker
✕

राज्यात दलित अत्याचारांच्या घटनेत घट

Updated: शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (10:28 IST)
 
२०१६मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या ४८ लाख ३१ हजार ५१५ इतकी आहे. २०१५मध्ये हीच संख्या ४७ लाख १० हजार ६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात २ लाख ८२ हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. २०१५मध्ये ती २ लाख ४१ हजार इतकी होती. उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे नोंदविले असले तरी गुन्ह्य़ांचे प्रमाण (प्रति एक लाख लोकसंख्या) देशात सर्वाधिक कमी म्हणजे १२८ इतके आहे. देशाची एकूण सरासरी २३३ आहे. महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या २०१५मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे. 
 
महाराष्ट्रातील दलित अत्याचारांच्या घटनांची संख्या खूपच कमी आहे आणि ती २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये आणखी कमी झालेली आहे. २०१५मध्ये १८०४ घटना घडल्या होत्या, २०१६ मध्ये ही संख्या घटून १७५०वर आलेली आहे. ४.३ टक्क्यांची ही घट आहे. 
 
दलित अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण लक्षात घेतले देशात महाराष्ट्राचा बारावा क्रमांक लागतो. या १७५० घटनांपैकी दलित महिलेच्या विनयभंगाच्या ३५२, लैंगिक छळवणुकीच्या १३७ आणि बलात्कार व बलात्काराच्या प्रयत्नांच्या २२० घटना आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

२८ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने ऑनलाइन गेमिंगमध्ये ४० लाख रुपये गमावले, सोने चोरले

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळणार, मॅग्नेट २.० मुळे आधुनिक कृषी पायाभूत सुविधांना गती मिळेल

MHT-CET मधील अनियमिततेच्या तक्रारींची SIT चौकशी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, पोलीस गृहनिर्माणासाठी सुलभ कर्जांना मंजुरी

MHT-CET पर्सेंटाइल प्रकरणावर रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; चौकशीसाठी ४ प्रमुख मागण्या

पुढील लेख
Show comments