ganesh chaturthi
✕

देशपांडे यांनी रचलेली "अवयवदान प्रतिज्ञा" झाली अधिकृत प्रतिज्ञा

Updated: मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (09:23 IST)
नुकत्याच काही महिन्यापूर्वी देशपांडे यांनी अवयवदान जनजागृतीसाठी नाशिक- ते आनंदवन असा सुमारे ११00 किमीचा प्रवास पायी केला होता. यांमाध्यमातून अवयवदान चळवळ त्यांनी उभी केली आहे. आता विविध माध्यमातून समाजामध्ये अवयव दान करण्यासाठी जनजागृतीसाठी काम  सुरु केले आहे. शाळा महाविद्यालय, संस्था आदी सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संवाद साधत, अवयव दानासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे.त्यांच्या या कामामध्ये त्यांच्या पत्नी सौ.रंजना देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
महाअवयवदान मोहोत्सव :
राज्य सरकारने २०१६ साली, समाजामध्ये  अवयवदाना विषयी जनजगृती व्हावी या साठी राज्य पातळीवर महाअवयव दान अभियान राबवले होते.आता २०१७ मध्ये देखील महा अवयवदान मोहोत्सव सरकार राबवणार आहे. दि.२९\०८\२०१७ ते ३०\८\२०१७ या दिवशी हा मोहोत्सव पूर्ण राज्यात आयोजित केला जाणार आहे.  
 
महा अवयवदान अभियानांतर्गत शासन 
परीपत्रक क्र. जागृती-0716/प्र.क्र.32
अधिनियम दि.19 ऑगस्ट 2017पृष्ठ8 पैकी 8
'अवयवदान प्रतिज्ञा'
'माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. पीडीतांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलवणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे अशी माझी श्रद्धा आहे.
अवयवदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणे शक्य होते तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे यावर माझा विश्वास आहे.
मी प्रतिज्ञा करीत आहे की माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल.
माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे.
माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहीन आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार व्हावेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन.' 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments