रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (17:12 IST)

साईबाबा संस्थाचा ब्रंड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव रद्द

साईबाबा संस्थानने अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर यांना ब्रंड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव अखेर अधिकृतपणे रद्द केला.साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त साई संस्थानने प्रचार व प्रसारासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला होता. या नेमणुकीस साईभक्तांमधून तीव्र विरोध होत होता. तसेच यावर प्रचंड टीका झाली होती. अखेर हा ब्रँड अँबेसिडर नेमण्याचा प्रस्ताव संस्थानने अधिकृतपणे रद्द केला आहे. साईभक्त हेच आता ब्रँड अँबेसिडर आहेत. त्यामुळे नवीन कोणी ब्रँड अँबेसिडर नेमण्याची गरज नसल्याचे सांगत याबाबतचा प्रस्ताव रद्द केल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी स्पष्ट केले आहे.