गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:21 IST)

लवकर निकाल लागतील, शिक्षणमंत्र्यांची सावध भूमिका

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी डेडलाईन देणार नसून, लवकर निकाल लागतील अशी सावध भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे. या शिवाय सर्व निकाल लागल्यानंतर कुणी दोषी आहे का याची चौकशी करून राज्यपाल कारवाई करतील असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे  तावडेंच्या अशा भूमिकेमुऴे त्यांनाही विद्यापीठाच्या कारभारावर विश्वास उरला नाही का असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी आधी 31 जुलै, मग 5 ऑगस्ट आणि त्यानंतर 15 ऑगस्ट अशा डेडलाईन्स दिल्या होत्या. मात्र या तीनही डेडलाईन्स मुंबई विद्यापीठाकडून पाळल्या गेल्या नाहीत. अजूनही अनेक विषयांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे.