गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (12:27 IST)

एमटीबी सायकलिंग महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा २० ऑगस्ट रोजी

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिकजिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा नाशिक शहरात घेण्यातयेणार आहे. पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत हा संघ महाराष्ट्राचेप्रतिनिधित्व करेल. ओरोबोरस या सायकल उत्पादक कंपनीच्या सहाय्याने नाशिक जिल्हा सायकलिंग संघटनेच्यावाट्याला पहिल्यांदाच अशी स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला आहे.

रविवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी ९ वाजेपासून त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील दुडगाव, महिरावणी (नाशिक) येथीलविशेष सायकल ट्रॅकवर ही माउंटन बाईकिंग (एमटीबी) स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी १९ ऑगस्ट रोजी दुपारी तीन तेपाच यावेळात खेळाडूंचा सराव होणार आहे. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक समितीने यासायकलिंग ट्रॅकला मान्यता दिली आहे.

नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशन मार्फत गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असून सायकलिंग हा खेळ म्हणूनलोकप्रिय व्हावा यासाठी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन सारख्या संस्थाना सोबत घेऊन प्रचार व प्रसार करत आहे.
जास्तीतजास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. प्रवेश अर्ज ए टू झेड सायकलस येथे उपलब्ध असून त्यासाठीकुत्बी मर्चंट ८८३०४५९४५२ या क्रमांकावर संपर्क करायचा आहे.

सायकलिंग हा खेळ म्हणून पुढे येणे आवश्यक असून देश विदेशात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनीसहभागी व्हावे यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे संघटनेसह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे मनोबलवाढविण्यासाठी या सायकलीस्टचा खेळ बघण्यासाठी नाशिककरांनी येण्याचे आवाहन एनडीसीएचे सचिव नितीननागरे यांनी केले आहे.

स्थळ : विशेष सायकल ट्रक, दामोदर पलेसच्यासमोर, दाते डेअरी, महिरावणी, त्र्यंबक रोड, नाशिक.
वेळ : सकाळी ९ वाजता, रविवार, २० ऑगस्ट २०१७.