गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (12:21 IST)

भाजपा प्रदेश अध्यक्षपदी खासदार धोत्रे

भाजपच्या प्रदेशअध्यक्षपद लवकरच निवड होणार आहे. नेहमीच वाद ओढवून घेत असलेल्या रावसाहेब दानवे यांची हकालपट्टी होणार आहे. या निवड प्रक्रिये साठी  प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे.

यामध्ये आघाडीवर असे  अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं नाव आहे. यामध्ये अकोला येथील खासदार संजय धोत्रेंनी हे त्यांच्या मतदार संघातून  तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय नोंदवला आहे तर त्यांनी  तीनही वेळा त्यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे.

मराठा, ओबीसी समाजातील नेतृत्वाकडे देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठा, ओबीसी नेतृत्वाची चाचपणी केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू आहे.