गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:30 IST)

दोघांकडून महिला पत्रकाराचा पाठलाग, पोलिसांनी केली अटक

मुंबईत मध्यरात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका तरुणीचा दोन मोटरसायकलस्वार पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असिरा तरन्नूम या महिला पत्रकार तरुणीने अंधेरी पश्चिमेकडील चित्रकुट मैदानाजवळून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.काही अंतरावर गेल्यानंतर मोटरसायकलवरून दोन तरुणांनी असिराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.या तरुणांनी रिक्षा थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच असभ्य भाषात शेरेबाजी देखील केली. अखेर असिराने पोलिसांना फोन केला. त्यावर नियंत्रण कक्षाने रिक्षा पोलिस तपासणी नाक्याकडे वळवण्यास सांगितले. त्यानंतर   रिक्षा वळवल्यावर दोघे विलेपार्लेच्या दिशेने पसार झाले. 

असिरा घरी सुरक्षित पोहचली याची खात्री पोलिसांनी तीन वेळा फोन करून केली. हा सर्व प्रकार तिने सोशल मीडियावर शेअर  केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.