गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

क्राईम पेट्रोलची अभिनेत्रीच निघाली आरोपी

सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल दस्तक मालिकेत भुमिका करणा-या अभिनेत्रीने अनेकाना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: तक्रार देण्यासाठी आलेली ही अभिनेत्री भोसरी पोलिसांच्या जाळ्यात अलगद फसली.
 
भोसरी पोलिस ठाण्यात तीन महिला व व एक पुरुष 8 जुलै रोजी बलात्काराची तक्रार देण्यास आले होते. मात्र त्यांची फिर्याद घेत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी फर्यादीलाच उलट चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला. क्राईम पेट्रोलमध्ये काम करणारी पुजा जाधव ही अभिनेत्री व तिचा सहकारी रविंद्र शिरसाम हे धनाड्य माणसाला फसवत व त्याच्यावर पुन्हा उलट गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकमेल करुन त्याला लुबाडत होते. याप्रकरणी रविंद्रसह माया भास्कर सावंत (वय-50) आणि सोनम दत्तात्रय पवार (वय-24 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अनिता जाधव आणि माया ओव्हाळ या दोघी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.